प्रवीण बाबूलाल हटकर___ गझल लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
प्रवीण बाबूलाल हटकर___ गझल लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

प्रवीण बाबूलाल हटकर___ गझल



हो! पुन्हा बघ धावण्याची जिद्द माझी
हारताना जिंकण्याची जिद्द माझी

ह्या मनाने त्या मनाशी एक व्हावे
माणसांना जोडण्याची जिद्द माझी

मज तुझ्या या आठवांची साथ व्हावी
श्रावणाला रडवण्याची जिद्द माझी

शांततेला बोलताना पाहिले जर
मग मुक्यांना ऐकण्याची जिद्द माझी

हसवितो सा-या जगाला विदुषका तू
आज तुजला हसवण्याची जिद्द माझी

शेत माझे व्हावया कसदार देवा
काळजाला पेरण्याची जिद्द माझी
____________________________