1.
मी नियतीशी झगडत आहे
नशीब माझे घडवत आहे
बघू कुणाची हिम्मत आता
कोण मला तो अडवत आहे
कुठे काहिली बघा उन्हाची
कुठे पिकाला सडवत आहे
कोण कुठे ते जगास कळते
कुणी स्वत:ची बडवत आहे
प्रयत्न करता तेलही गळे
कण वाळूचे रगडत आहे
2.
रोखले होते कधीचे श्वास माझे
मी स्वत:ला भेटलो की भास माझे ?
टाळती जे सोबतीला घ्यावयाला
काल परवा मित्र होते खास माझे
अंत्ययात्रा चालली रस्त्यावरी ज्या
थांबलेले लोक झाले दास माझे
मी असा समदूर बिंदू वर्तुळाचा
दंडवत साष्टांग त्या परिघास माझे
दान मी टाकू कसे हे सांग आता
लागले आता गळ्याला फास माझे
जीव माझा गुंतला आहे तिथे पण
प्राक्तनी आता इथे रे घास माझे
भेटली गर्दीत माझी लाडकी अन्
संपले रे निर्जळी उपवास माझे
____________________________
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा