संजय विटेकर___गझल



मोसमाचा मायना बदलून गेलो
मी बहर नसला तरी बहरुन गेलो

तू दिलेल्या कोरडया घावात पण मी
आसवांना फुलवणे शिकवून गेलो

भोगलेले क्षण पुन्हा यावे कशाला
कोणत्या घावास मग झेलून गेलो

तरसलो नाही भुकेसाठी कधी पण
भाकरीची आग का भोगून गेलो

ठेवले आदर्श सारे वळचणीला
माणसे दगडात मी कोरुन गेलो
_______________________


1 टिप्पणी:

  1. आदरणीय,
    डॉ.राऊत सर एक विनंती आहे. आपल्या हातुन झालेली निवड म्हणजे गज़लकारांचा सन्मानच....पण वाचक व नविन शिकणा-या कविंसाठी जर रचनेतील लघु गुरुंचा क्रम, मीटर व वृत्ताबाबत माहिती दिली गेली...तर खुप चांगले होईल.आपण माझ्विया विनंतीचा विचार कराल ही अपेक्षा
    पुणे येथे आपणास '' जिवन गौरव '' पुरस्कार प्रदान करण्यात आला तो सोहळा प्रत्यक्ष अनुभवन्याच भाग्य मला पामराला लाभल....जास्त काय लिहू..
    आपला नम्र
    चारुदत्त मेहरे

    उत्तर द्याहटवा