संजय विटेकर___गझल लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
संजय विटेकर___गझल लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

संजय विटेकर___गझल



मोसमाचा मायना बदलून गेलो
मी बहर नसला तरी बहरुन गेलो

तू दिलेल्या कोरडया घावात पण मी
आसवांना फुलवणे शिकवून गेलो

भोगलेले क्षण पुन्हा यावे कशाला
कोणत्या घावास मग झेलून गेलो

तरसलो नाही भुकेसाठी कधी पण
भाकरीची आग का भोगून गेलो

ठेवले आदर्श सारे वळचणीला
माणसे दगडात मी कोरुन गेलो
_______________________