सुखाने हाय जगण्याला किती छळले व्यथाराणी,
तुला टाळू नये कोणी मला कळले व्यथाराणी!
फुले व्हावीत अश्रुंची...असे तेव्हा ऋतू होते,
तिच्या स्मरणात रडण्याचे दिवस ढळले व्यथाराणी!
कुणी समजावुनी सांगा अता या सांत्वनालाही,
रुमालाने पुन्हा अश्रु किती जळले व्यथाराणी!
कधी मी मांडला नाही गडे आकांत जन्माचा;
युगाचे कोरडे अश्रु कुठे गळले व्यथाराणी?
महालातून रस्त्यावर...सखी आली जराशी तर...
फुलांचे पाय मातीने म्हणे मळले व्यथाराणी?
______________________________________
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा