रविप्रकाश___गझल लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
रविप्रकाश___गझल लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविप्रकाश___गझल




सुखाने हाय जगण्याला किती छळले व्यथाराणी,
तुला टाळू  नये  कोणी  मला  कळले व्यथाराणी!

फुले  व्हावीत अश्रुंची...असे तेव्हा ऋतू  होते,
तिच्या स्मरणात रडण्याचे दिवस ढळले व्यथाराणी!

कुणी  समजावुनी  सांगा अता या सांत्वनालाही,
रुमालाने  पुन्हा  अश्रु   किती   जळले व्यथाराणी!

कधी  मी  मांडला  नाही  गडे आकांत जन्माचा;
युगाचे  कोरडे  अश्रु   कुठे   गळले व्यथाराणी?

महालातून रस्त्यावर...सखी आली जराशी तर...
फुलांचे पाय  मातीने  म्हणे  मळले व्यथाराणी?
______________________________________