बळीराम पोधाडे___गझल




राबला दिनरात माझा बाप होता
नाहला घामात माझा बाप होता

भरजरी कपडे दिले मजला तरी पण 
फाटक्या कपड्यात माझा बाप होता

सावली त्याची जरी माझ्या शिरावर 
पेटत्या वणव्यात माझा बाप होता

चार भिंती आज माझ्या भोवताली 
राहिला खोप्यात माझा बाप होता

वैभवाला आज माझ्या अंत नाही
काल दारिद्र्यात माझा बाप होता
____________________________  
               

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा